भक्तनिवास

भक्तनिवास



        अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे गणपतीपुळे. सागराच्या मधुर लाटांच्या सानिध्यात किनाऱ्यावर प्रगट झालेला लंबोदर गणेश म्हणजे पुळ्याचा गणपती.


        या गणेशाच्या दर्शनसाठी महाराष्ट्रातून भाविक येत असत परंतु आता देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची वर्दळ येथे सुरु झाली आहे. वर्षाला साधारणतः १८ ते २० लाख भाविक व पर्यटक गणपतीच्या मंदिराला भेट देतात. भक्तांना निवासाची चांगली सोय उपलब्ध व्हावी म्हणून देवस्थानाने २३/९/२०१० रोजी मा. मोरेश्वर घैसाल गुरुजी यांच्या शुभहस्ते भक्तनिवासाचा भूमिपूजन सोहळा संपन्न केला व भाविकांसाठी अत्याधुनिक सेवासुविधा असलेले भक्तनिवास बांधण्याचा संकल्प केला व सुमारे साडे चार वर्षांच्या कालावधीनंतर भक्तनिवासाचे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या भक्तनिवासाचे संपूर्ण बांधकाम सुमारे ७०,००० स्वेअर फुटाचे आहे. तळमजल्यावर पार्किंगची सोय आहे. पहिल्या मजल्यावर १५ डॉमॅरिज आहेत. प्रत्येक डॉमॅरिमध्ये सुमारे २५ भाविक राहू शकती म्हणजे ३०० भाविकांची सोय डॉमॅरिमध्ये अल्पदरामध्ये करता येणार आहे. दुसऱ्या मजल्यावर ३६ सेल्फ कन्टेन खोल्या आहेत यामध्ये काही ठिकाणी २ तर काही ठिकाणी ३ लोक राहण्याची सोय आहे. या खोल्यामध्ये सुमारे १०० भाविकांची सोय होणार आहे. भविष्यात या खोल्या वातानुकुलीत करण्याचा देवस्थानाचा मानस आहे. याशिवाय प्रत्येक मजल्यावर ३००० स्क्वेअर फुटाचे सभागृह अशी तीन सभागृहे आहेत. या मध्ये एक सभागृहाचा वापर स्वयंपाक व देवस्थानच्या लाडूप्रसाद तयार करणे यासाठी होणार आहे. एक सभागृह विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वापर करणे हे उद्दिष्ट आहे व एका सभागृहाचा वापर विविध विद्यार्थी सहली येतात त्यांना निवासासाठी अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


        या भक्तनिवासामध्ये पुरेशी परिपूर्ण स्वच्छतागृहे व स्नानगृहे आहेत. मुबलक पाणी व्यवस्था आहे. अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे म्हणून सौर उर्जेचा वापर करण्यात आला आहे. भक्तांच्या सोयीसाठी दोन लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. पिण्याचे स्वच्छ पाणी, चहा, कॉफीची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यात भोजनाची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करता यावा व परिसर दुर्गंधरहित रहावा यासाठी एस.टी.पी. प्लांट देखील बनवला आहे. पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी शौचालयातील फ्लशटँकला वापरण्यात येणार आहे. दर्शनी भागात सुंदर बाग तयार केली आहे. लाईट गेली तर जनरेटर बॅकअपची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तनिवासाचा परिसर अतिशय रमणीय व आल्हाददायक आहे. भाविकांची निवास व्यवस्था चांगली व्हावी व परिसर स्वच्छ रहावा यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग ठेवण्यात आला आहे.
        एकूणच गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासव्यवस्थेसाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळेने सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा भक्तनिवासाची निर्मिती केली आहे. त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा.

पत्ता


भक्त निवास

संस्थान श्रीदेव गणपतीपुळे

मु. पो. भगवतीनगर - निवेंडी,
ता. जि. रत्नागिरी, ४१५६१५

निवास व्यवस्था माहिती


खोली प्रकार खोली संख्या एकूण व्यक्ती
३ बेड नॉन ए.सी. (गॅलरी) १८ ५४
२ बेड नॉन ए.सी. (गॅलरी) १२ २४
२ बेड नॉन ए.सी. १७ ३४
२ बेड नॉन ए.सी. (एकत्र) २० ४०
२ बेड ए.सी. १०
एकूण ७२ १६२
हॅाल प्रकार हॅाल संख्या एकूण व्यक्ती
डॅार्मेटरी - बेड १०३
डॅार्मेटरी - सतरंजी २००
एकूण ११ ३०३